आमच्या सहयोगी कार्यसंघाच्या व्यावसायिक दृष्टिकोनामुळे आम्हाला ग्राहक आणि पुरवठादार दोघांकडून प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. आतापर्यंत केलेल्या सेवाकार्याचा अंदाजे आलेख खालीलप्रमाणे आहे.
55
ट्रकस् / टेम्पो
500
समाधानी ग्राहक
150
सप्लायर
150000
ट्रिप्स
मित्रांनो, माझी कथा खूप सरळ आहे परंतु थोड़ी फ़िल्मी सुद्धा आहे. आयुष्यात काहीतरी करण्याची इच्छा होती. एक मार्ग निवडला आणि प्रवासाला निघालो हळूहळू वाटेत अनेक चांगले लोक भेटू लागले आणि सहयोगी वाढू लागले. या प्रवासात जो अद्याप चालू आहे आणि देवदयेने पुढे चालूच राहील, अनेक लोक येतील. आतापर्यंतची कथा आनंद, दु:ख, त्रास, पराभव आणि विजय, शोक, विरह अशा सर्व भावनांनी परिपूर्ण आहे. ज्याप्रमाणे शरीरात रक्ताचे महत्त्व असते, त्याचप्रमाणे कथेत भावनांचे महत्त्व आहे. जे त्यांच्या आवक्यापेक्षा काही अधिक करतात. त्याची कथा लोकांना सांगितले जाते. आयुष्य प्रत्येकाची परीक्षा घेते आणि प्रत्येकाला संधी देते. कोणी त्या संधीचा फायदा घेत पुढे सरसावतो तर कोणी संधी मिळते तेव्हा आपला आनंद आणि सुख सोडू शकत नाही. प्रगती करण्यास तोच सक्षम असतो जो योग्य संधी मिळताच ती उचलून घेतो. माझ्या कथेची सुरवात ....
अनुभवी आणि जोशीले संचालक कंपनीचे कामकाज संचलन करीत आहे.
मोबाइल क्रमांक - ९३२००८७८०२ / ०४ / ०६ / ०८ इमेल आयडी : traffic@kismatlorryservice.com
मोबाइल क्रमांक - ९३२००८७८०३ इमेल आयडी : account@kismatlorryservice.com
जरा आठवा की आपल्या वरिष्ठांनी वाहतूक व्यवसायाचे प्रबंदन कसे केले. चेकनाका मध्ये आमचे सर्व आदरणीय थोर मंडळी दत्ता मंदिराजवळ गोळा व्हायचे आणि जे काही उपलब्द असतील त्या मर्यादित साधनांचा वापर करुन ते उद्योग करण्याचा प्रयत्न करायचे. बुकिंग वा ट्रिपचे व्यवस्थापन हे त्या काळी अत्यंत त्रासदायक असे. काम करत असताना सतत वाजणार्या फोनमुळे ते त्यांची कामे लिहायला सुद्धा विसरत असत. परिणामी व्यवसायाची हानी होत असे आणि कधीकधी तर पेमेंट सुद्धा मिळत नसे. आता काळ बदलला, तरुण वर्गाने त्यांच्या व्यवसायात रस घेतल्यामुळे आता परिवहन उद्योगातील ट्रांसपोर्ट व्यवसाय करण्यासाठी तंत्रज्ञानाची ओळख करुन घेतली आहे. परंतु अजुनही अनेक वैयक्तिक ट्रक मालक किंवा ट्रान्सपोर्टर आधुनिक तंत्रज्ञानापासून बरेच दूर आहेत ज्यामुळे ते मुख्य प्रवाहातील व्यवसायापासून दूर आहेत. व्यवसायात योग्य धोरणाची पद्धत वापरणे फार आवश्यक आहे. हा घटक लक्षात घेऊन आम्ही वापरत असलेल्या पद्धातिप्रमाणे त्यांना मदत करण्याचे आणि बुकिंग, ट्रॅकिंग आणि एकाउंटिंग यासारख्या त्यांच्या समस्यांचे निराकरण करण्याचा विचार करीत आहोत.
आपल्या व्यवसायातील लॉजिस्टिक्स कार्य करण्यासाठी आमच्याकडे संभवतः सर्व उपाय आहेत.
प्रत्येक कार्य ही ईश्वर सेवा समजुन आम्ही काम करीत असतो. आपली सेवा हेच आमचे मिशन असल्याकारणास्तव आम्ही आपल्या कार्यात पूर्णपणे वाहून घेतो.
आम्ही आमच्या कामात नियमित असल्याकारणास्तव उत्कृष्टता और उत्तमता त्यात दिसून येते. आपले काम पूर्ण होईपर्यन्त आम्ही सतत कार्यशील असतो.
आम्ही आमचे मिशन पूर्ण करण्यासाठी २४तास कार्यरत आहोत. आमची इच्छा आहे की आपली सेवा आता आणि भविष्यात अखंडपणे करीत राहू.
कामात सहयोग यावर आमचा विश्वास आहे. प्रत्येक प्रोजेक्ट, ट्रिप आमच्यासाठी महत्वपूर्ण आहे. आपली सेवा आम्ही प्रसंग समजुन प्रत्येकाची मदत घेउन पूर्ण करीत असतो.
प्रत्येक क्षेत्रातील तज्ञ व्यक्ति आमच्याशी जोडले गेले आहेत ज्यांच्या अनुभवाचा आम्ही ट्रांसपोर्ट सेवाकार्यात उपयोग करत असतो.
आम्ही ठाणे, मुंबई, भिवंडी आणि सभोवतालच्या १k० कि.मी. क्षेत्रात विविध प्रकारच्या वस्तूंच्या वाहतूक सेवा प्रदान करीत आहोत. ट्रक, टेम्पो, कंटेनर, छोटा हाथी इत्यादि सर्व प्रकारचे वाहन उपलब्द आहेत.
आमच्याकडे दररोज विशिष्ट निश्चित मार्गांवर वस्तूंची वाहतूक सेवा असते. भिवंडी ते तळोजा, पनवेल ते ठाणे, ठाणे ते वसई आणि नविन मार्गांची चाचपणी सुरु आहे.
आम्ही कराराच्या आधारे ट्रांसपोर्ट सेवा देखील घेतो. कोणत्याही कंपनीला त्यांच्या वाहतुकीची गरज भागवायची असेल तर आम्ही त्यांच्या गरजेनुसार करार करुन त्यांची सेवा करू शकतो.
आमच्याकडे आपल्या सेवेकरिता सर्व प्रकारचे ट्रक इत्यादि वाहन उपलब्ध आहेत.
आम्ही आमच्या ग्राहकांच्या अभिप्राया बाबत आभार व्यक्त करीत आहोत. असंख्य आनंदित ग्राहकोंपैकी काही...
चला तर पाहुया ते का्य म्हणतात.
आमचा प्रोजेक्ट पूर्ण करण्यासाठी केलेल्या सेवेसाठी आभार | आम्ही आपल्या अनुभवी सेवकवर्गांचे धन्यवाद करतो.
आपण आपल्या तत्पर सेवेसाठी ओळखले जाता | किस्मत लॉरी सर्वीस आपल्याला हार्दिक शुभकामना.
आपल्या अमूल्य सहकार्यासाठी धन्यवाद | आपल्या प्रगतीसाठी शुभकामना |
आमचा प्रोजेक्ट पूर्ण करण्यासाठी केलेल्या सेवेसाठी आभार | आम्ही आपल्या अनुभवी सेवकवर्गांचे धन्यवाद करतो.
आपण आपल्या तत्पर सेवेसाठी ओळखले जाता | किस्मत लॉरी सर्वीस आपल्याला हार्दिक शुभकामना.
आपल्या अमूल्य सहकार्यासाठी धन्यवाद | आपल्या प्रगतीसाठी शुभकामना |
kismatlorryservice@gmail.com
+९१ ९३२००८७८०१
+९१ ९३२००८७८०२
.
उत्तर : तसे पाहिले तर आमचा कार्यालयीन वेळ सकाळी १० वाजेपासून रात्री ८ वाजेपर्यंत आहे. आपल्याला निवेदन आहे की आपण याच वेळेत आमच्या सेवाधिकारी बरोबर चर्चा करून बुकिंग करा. परंतु ऑनलाइन बुकिंग आपण केंव्हाही करू शकता.
उत्तर : क्षमस्व! आम्ही पार्सल बुकिंग सेवा सुरु केलेली नाही. आम्ही फ़क्त एफ टी एल ( फुल ट्रक लोड ) चीच बुकिंग स्विकारतो. आमचे बहुतेक ग्राहक पार्सल बुकिंग सेवा देण्याचे काम करतात.
उत्तर : नाही, सेवाशुल्क वजन (लोड) आणि गंतव्य स्थान (लोकेशन) वर ठरवले जाते. आपण आमच्या सेवाधिकारी बरोबर चर्चा करून सेवाशुल्क निश्चित करू शकता.
प्यार की कमी को पहचानते हैं हम, दुनिया के गमो को भी जानते हैं हम, आप जैसे दोस्त का सहारा है तभी तो आज भी हंसकर जीना जानते हैं हम |
जीवनात प्रेमाचा अभाव , आणि दुःखाचा शिरकाव याची जाणीव आहे मला , परंतु तुझ्यासारख्या मित्रामुळे आजही आनंदात जगतो याचे श्रेय आहे तुला.
दत्ता आमचा सहकारी आहे, पण सर्वप्रथम तो माझा मित्र आहे. जो मित्र न बोलावताच येतो आणि विनाकारण डोकं खात बसतो, खिसा रिकामा करतो, कधी छळत असतो तर कधी रडत बसतो पण नेहमीच माझ्या पाठीशी उभा राहतो. एक खरा मित्र, जो नेहमीच उचित सल्ला देतो आणि सहजतेने मदत करतो. माझ्यासाठी कुठलीही जोखीम सहजपणे घेतो, प्रत्येक गोष्ट संयमाने सहन करतो. धैर्याने माझा बचाव करतो आणि नि:खळ मैत्री जपतो. दत्तमंदिरातील दत्तभगवंताला मी प्रार्थना करतो की हे देवा मी असो वा नसो माझ्या या मित्राचे सदैव रक्षण कर. दत्तासेठ एक धैर्यवान, मिलनसार, आणि अस्सल व्यक्तिमत्व आहे, जो नेहमीच नवनवीन कल्पनेसह व्यवसाय करीत असतो.
सफलता के लिए ग्यान जरुरी है, ग्यानप्राप्ति के लिए परिश्रम जरुरी है| परिश्रम के लिए उर्जा जरुरी है, उर्जा सिर्फ अच्छे विचारोंसे मिलती है|
यशासाठी ज्ञान आणि ज्ञानप्राप्तीसाठी परिश्रम करणे आवश्यक आहे. श्रम करण्यासाठी ऊर्जा आणि ऊर्जा फक्त चांगल्या विचारांमधून येते.
या जगात असे बरेच लोक आहेत ज्यांना जीवनात यशस्वी व्हायचे आहे, परंतु त्यांना योग्य मार्ग मिळत नाही. परंतु असे लोक आहेत जे प्रत्येक वेळेस योग्य मार्ग ओळखतात आणि इतरांना देखील सांगतात. श्री शेखर गायकवाडसाहब स्वतः प्रगती करत असतात त्याचबरोबर इतरांना सुद्धा मदत करण्यासाठी नेहमी पुढे असतात. सकारात्मक उर्जासह विचार करण्याची आणि समजून घेण्याची त्यांची विशेष दृष्टी आहे. श्री शेखर गायकवाडसाहब हे आमचे पहिले सहकारी-व्यवसायी होते आणि नंतर मित्र बनले. मैत्रीवर आधारित व्यवसायापेक्षा, व्यवसायावर आधारित मैत्री अधिक चांगली असते हे त्यांना भेटल्यानंतर कळले.
जुनैद भाई
न्यूप्रो (इंडिया)
कोकण को-ऑपरेटिव्ह बैंक लिमिटेड
आय सी आय सी आय बैंक लिमिटेड
आशा गेराज
कहानियां बढ़ा-चढ़ा कर बताई जाती है, हकीकत हमेशा ही छुपाई जाती है | ( कथा अतिशयोक्तीपूर्ण असतात, वास्तविकता नेहमीच लपलेली असते. )
चांगल्या नेत्याचा विशेष गुण म्हणजे जेव्हा तो एक काम हाती घेतो तेंव्हा त्या वेळी इतर कोणतेही काम न करता 100% त्यात लक्ष देतो. त्याचवेळी त्या कार्यासाठी एकनिष्ठ होतो आणि त्या कामाचे पूर्ण प्रतिनिधित्व करतो. श्री विजय यादव साहब कोणत्याही विषयावर उपलब्द माहितीनुसार वेळ न दवड़ता त्वरित कार्यान्वित होतात. ते भावनांना समतोल ठेवून सर्वांवर सकारात्मक प्रभाव पाडणारे निर्णय घेण्यात नेहमी यशस्वी होतात. गीतेत असे म्हटले आहे की कर्म करा आणि फळाची वाट पाहू नका. श्री विजय यादव हे त्यांच्या आयुष्यात अक्षरशः अनुसरण करतात. कोणतीही व्यक्ती मग ती मोठी वा लहान, गरीब असो किंवा श्रीमंत कोणत्याही जाती-धर्माचा असो, विजय यादव साहब कोणत्याही भेदभावाशिवाय सर्वांना मदत करतात.
तेरी कहानी को पूरी दुनिया गायेगा, जब तू हर मुसीबत को हरायेगा | ( जेव्हा आपण प्रत्येक संकटात विजय मिळवाल. तेंव्हा सर्व आपले गुणगौरव करतात. )
श्री देवेन्द्र राजपूत सर्वसमावेशक व्यक्तिमत्वाचे धनी आहेत. सर्व वाहतूक व्यावसायिक बंधूंच्या समस्या सोडवीण्यासाठी व त्रासातून मुक्त करण्यासाठी ते नेहमीच तत्पर असतात. गाड़ीचा अपघात झाला किंवा ड्रायव्हरला कोणतीही अडचण असेल तरी श्री देवेन्द्र भाई घटनास्थळी पोहोचण्यास उशीर करत नाहीत. सर्व समस्या सोडवल्यानंतरच ते तेथून रजा घेतात. प्रत्येकाच एक वैशिष्ट्य असते, परंतु ज्याच्याकडे प्रामाणिकपणा आहे, त्यांच्या वागण्यात आणि कृतीत तो दिसतो आणि त्याची स्वतःची वेगळी ओळख निर्माण होते.. श्री देवेन्द्र भाई एक प्रामाणिक व्यक्ती आहेत, आपले कार्य ईमानदारीपूर्वक नि:पक्ष भूमिका घेउन करण्याकडे त्यांचा कल असतो.
जिंदगानी में जब किरदार कमजोर होता है, सफल होते है वे, जिनका परिश्रम करने पर जोर होता है | ( जीवनात जेव्हा भूमिका चलबिचल होत असते, तेंव्हा तेच यशस्वी होतात जे कठोर परिश्रम करतात.)
आई वडिलांनंतर आमच्या आयुष्यातील सर्वात मोठे व्यक्तिमत्व. होय, हे आमचे सासरे आहेत, यांच्यामुळेच आम्ही वाहतुकीचे काम शिकलो. मी त्यांच्या कंपनीत काम करायचो. ड्रायव्हिंग करत असताना आम्हाला सिदधूसाहेबांमुळे आपले काम सुरू करण्याची संधी मिळाली. त्यांच्यामुळेच आम्ही आमची कंपनी सुरू करू शकलो. त्यांनी प्रत्येक क्षणी आम्हाला पाठिंबा दिला आणि कुटुंबात ऐक्य राखण्यासाठी आम्हाला मदत केली.
किसी की मदद करने के लिए केवल धन की जरूरत नहीं होती, उस के लिए एक अच्छे मन की जरूरत होती हैं | ( प्रत्येक वेळेस एखाद्याची मदत करण्यासाठी फक्त पैशांची गरज नसते, तर चांगल्या मनाची आवश्यकता असते. )
आमच्या इदू मामाने हेच सिद्ध केले आहे. जेव्हापासून आम्ही कंपनी सुरू केली तेव्हापासून आमच्या प्रत्येक सुख-दु:खात ते नेहमीच आमच्याबरोबर होते. दिवस असो की रात्र, उन्हाळा असो की पावसाळा ते नेहमी आपच्या खांद्याला खांदा लावून उभे असतात. एक अनुभवी व्यक्तिमत्त्व असल्यामुळे त्यांच्या मार्गदर्शनाचा आम्हाला खूप फायदा झाला. आणि किस्मत लॉरी सर्विस कुटूंबातील सदस्य असल्याने, आम्ही आशा करतो की ते असेच आमच्याबरोबर असतील.
मुसीबतों में भी सफर आसान लगता हैं, ये मुझे परिवार के साथ का असर लगता हैं | ( जीवनप्रवास संकटातही सुलभ आहे, याचे कारण माझे कुटुंब सोबत आहे हेच वाटते.)
आनंदाने आयुष्य जगण्याचे वास्तविक स्वरूप केवळ एकत्रित कुटुंबाकड़े पाहिले जाते. आमच्या कुटुंबाने नेहमीच आम्हाला भक्कम आधार आणि साथ सोबत दिली. आज आम्ही जे काही करू शकलो त्याचे श्रेय प्रामुख्याने आमच्या एकत्रित कुटुंब पद्धतितच दिसून येते. कुटुंबातील सर्व सदस्य नेहमीच आमच्या पाठीशी उभे होते. देवाचे अत्यंत आभार, कुटुंबाकडून मिळालेले निस्सीम प्रेम आणि विश्वास यामुळे आम्ही सदैव प्रत्येकाचे ऋणी आहोत.
Police
Checknaka Truck Associations
Rabodi Truck Associations